भौगोलिक माहिती
स्थानिकता
मुख्यालयापासून १3 किमी अंतरावर हे गाव स्थित आहे. कौलगे गाव सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात येते.
भौगोलिक संरचना
कौलगे हे गांव तासगांव-सावळज रोड वर कापूर ओढा काठी वसलेले असून सांगली पासून ५० कि.मी. व तासगांव पासून 12 कि.मि. आहे एकूण भौगोलिक क्षेत्र २६२.२४ है २.४२ आर असून त्यामध्ये गावठाण क्षेत्र २ है ४२ आर तसेच पीक जमीन क्षेत्र २४ हे. ६१ आर एवढे असून शेतीखाली एकूण क्षेत्र २४९.०० हे. ७४ आर. एवढे आहे. गायरान क्षेत्र २ हे. ४२ आर एवढे आहे. ओढा जरी वाहत असली तरी गावाला पुराचा धोका संभवत नाही. गावातील बहुतेक लोकांचा व्यवसाय शेती व शेतीपूरक पिकांवर आधारित आहे गावातील शेतील मुख्य पिके ऊस, दाक्षे, हरभरा, ज्वारी इ. पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. गावात जि.प.ची इयत्ता १ ली ते ४ वी पर्यंत शाळा असून त्याबरोबर न्यू इंग्लिश स्कूल कौलगे हे हायस्कूल ५ ते १० वी पर्यत आहे त्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तासगांव येथे जावे लागते. सन २०११ च्या जनगणनेनुसार गावात एकूण कुटुंबसंख्या ३०क असून एकूण लोक्संख्या-१४ ८१ आहे यामध्ये पुरुष ७६० व स्त्रीया ६२१ आहेत. १) गावाची विस्तृत माहिती खालीलप्रमाणे ग्रामपंचायत नाव - कौलगे स्थापना - १९५९ एकूण सदस्य संख्या - ७ लोकसंख्या - १४ ८१ पुरुष - ७६० स्त्री - ६२१
जलवायू
उन्हाळा: उन्हाळ्यात तापमान ३५-४० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते.पावसाळा: जून ते ऑक्टोबर या कालावधीत पाऊस वाजवी प्रमाणात पडतो. या कालावधीत तापमान कमी होऊन आर्द्रतेचे प्रमाण वाढते.हिवाळा: हिवाळ्यात तापमान १०-१५ डिग्री सेल्सियसपर्यंत कमी होऊ शकते.
कृषी
कृषी कौलगे प्रमुख व्यवसाय शेती आहे. गावात पिके पाऊस आणि योग्य जमीन यावर अवलंबून असतात. मुख्य पिकांमध्ये ऊस , द्राक्षे , ज्वारी, गहू हरभरा तूर ,मुग आणि काही स्थानिक भाज्या समाविष्ट आहेत.
प्राकृतिक साधनांची उपलब्धता
माती: गावच्या आसपास काळी माती आणि लाल माती आहे, जी शेतीसाठी योग्य आहे.
संस्कृती आणि इतिहास
गावाच्या भौगोलिक स्थितीमुळे, त्यात प्राचीन आणि आधुनिक इतिहासाचे मिश्रण दिसून येते. गावात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या स्थळांचा समावेश आहे, आणि स्थानिक जीवन व परंपरांच्या दृष्टिकोनातून देखील ते महत्वाचे आहे.